ANDHARATIL URVASHI

Author : NARAYAN DHARAP

ISBN No : 9789352204533

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : Saket Prakashan


“खोलीवरचे लक्ष आणखी एकाग्र झाले. तेव्हाच ती अत्यंत अस्पष्ट हालचाल त्याच्या ध्यानात आली. एक चमचमणारी रेषा सरळ वरून खाली जात होती, किंचित वाकडी होऊन परत वर येत होती, पुन्हा खाली...
दर वेळी तो आवाज - स्-स्-स्-स्...! स्-स्-स्-स्...!
आणि एकदम त्याला तो आवाज कशाचा होता, ते आठवले.
स्त्रीचा केस विंचरण्याचा आवाज!
अनिलचे शरीर अगदी निश्चल झाले. डोळ्यांची पापणीसुद्धा लवत नव्हती; पण उराच्या पिंजर्‍यात काळीज मात्र तडफड तडफड करीत होते. खोली एकदम बर्फासारखी थंड झाली होती; पण त्याच्या शरीरातले रक्त मात्र हृदयाच्या स्पंदनाखाली उकळत होते. जाणिवेच्या एका टोकाला उत्कट अपेक्षा होती, दुसर्‍या टोकाला मनस्वी भीती होती - या परस्परविरुद्ध ताणाखाली अस्मिता पिळली जात होती. संवेदनांची कमान चढत जात होती - खोलीतले रहस्य आपले भयानक आणि तितकेच आकर्षक रूप त्याच्यासमोर खुले करीत होते. युगांतापर्यंत पसरत गेलेल्या एकाच क्षणात मनात कितीतरी विचारांनी गर्दी केली... हेच खोलीचे आकर्षण आहे! आणि हाच प्रभाव गीताला पहिल्या भेटीपासून जाणवत होता! त्याच्यासाठी -अनिलसाठी हा अदृश्य पट खुला झाला होता! त्याच्यासाठी दृश्यसृष्टीवरचा पडदा मागं खेचला गेला होता! त्याच्यातच काहीतरी अलौकिक असले पाहिजे! एक अभूतपूर्व, असामान्य दर्शन...
स्-स्-स्-स्...! स्-स्-स्-स्...!
कंगव्याची चंदेरी कड वरून खाली, वरून खाली, एकसारखी घसरत होती. एक अस्पष्ट दर्शन, एक अस्पष्ट आवाज... एक चाहूल! त्या पुनरुक्तीत काहीतरी मोहक होते, काहीतरी आकर्षक होते...
भीती एका परमोच्च बिंदूपर्यंत गेली आणि वळून पडली... मागे राहिले ते एक विलक्षण आश्चर्य, एक अनिवार्य आसक्ती...”
...प्रस्तुत पुस्तकातून

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories