TALGHAR

Author : NARAYAN DHARAP

ISBN No : 9789352203635

Language : English

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : Saket Prakashan


“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण... पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते.... जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या.... कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती....आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला.... उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या.... आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता.... तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे.... काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW... त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला... “मी आलो आहे."

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories