Author : M K GANDHI
ISBN No : 9789393757647
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : BIOGRAPHY
Publisher : VISHWAKARMA
पहिल्यापासून माझे असे मत आहे की, जे एकाला शक्य आहे, ते सर्वांना शक्य आहे. त्यामुळे माझे प्रयोग खासगी म्हणून झालेले नाहीत, खासगी राहिलेलेही नाहीत. ते सर्वांनी पाहिले म्हणून त्यांची आध्यात्मिकता कमी होत असेल असे मला वाटत नाही. अलबत, अशा कित्येक गोष्टी असतात की, ज्या आत्म्यालाच समजणार, आत्म्यातच अंतर्धान पावणार. अशा गोष्टींचे वर्णन माझ्या शक्तीपलीकडचे आहे. माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक म्हणजे नैतिक, धर्म म्हणजे नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म. अर्थात, ज्या गोष्टींचा निर्णय बालक, तरुण व वृद्ध करतात व करू शकतात, अशा गोष्टींचाच समावेश या कथेमध्ये आहे.