Author : RAM SHEVALKAR
ISBN No : 19082021M04
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : utkarsh prakashan
‘अमृतझरी’ व ‘पूर्वेची प्रभा’ यानंतरचे ललितलेखांचे हे तिसरे पुस्तक. यामध्ये काही आत्मपर लेखनही आहे. काही दृष्ये, काही प्रसंग व काही व्यक्ती यांनी माझ्या मनावर उठविलेले तरंग सुरुवातीच्या लेखांमध्ये उमटलेले आहेत. तर काही निमित्ताने अंतर्मुख होऊन स्वत:चा घेतलेला शोध आत्मनेपदी लेखनात प्रगटला आहे.
‘आकाशाचा कोंब’ नंतर वर्षभरातच लगोलग दुसरेही पुस्तक उत्कर्ष बुक सर्व्हिसचे श्री. सुधाकर जोशी यांनी प्रकाशनासाठी हाती घेतले. या त्यांच्या लोभाबद्दल व साहसाबद्दल त्यांना अभिनंदनपूर्वक धन्यवाद!
- राम शेवाळकर