Author : VINAYAK SAVARKAR
ISBN No : 05082021M01
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : CONTINENTAL PRAKASHAN
Currently Unavailable - Still you can add in CART.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव जरी उच्चारले, तरी चैतन्याचा संचार झाल्यासारखे वाटते. त्याच सावरकरांच्या लेखणीतून हे पुस्तक साकारले आहे. स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतविण्याचे काम या ग्रंथाने स्वातंत्र्यपूर्व काळात केले होते. ज्वालामुखी, स्फोट, अग्निकल्लोळ आणि तात्पुरती शांतता या चार भागांत हे पुस्तक विभागले आहे.
स्वधर्म आणि स्वराज्यापासून पहिल्या भागाची सुरवात होते. दुसऱ्या भागात शहीद मंगल पांडे, आयोध्या प्रांतातील रण आदींचा समावेश होतो. तिसऱ्या भागात तात्या टोपे, लक्ष्मीराणी या व्यक्तीमत्वांचा मागोवा घेतला आहे; तर पूर्णाहुती आणि समारोपाने पुस्तकाची सांगता होते. सावरकरांनी लिहिलेल्या शब्दांच्या या तेजशलाका सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमराचा पूर्ण अनुभव देतात.