Author : NIRUPAMA PRADHAN SONALKAR
ISBN No : 21012021M2
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : NON FICTION
Publisher : GRANTHALI PRAKASHAN
हिटलरने ज्यूंची कत्तल केली ते जर्मनी, दुसरे जागतिक महायुद्धातील जर्मनी, बर्लिनच्या भिंतीमुळे विभाजन झालेले जर्मनी एवढीच माहिती बहुतेकांना या देशाबद्दल असते. अशा या अनोळखी देशात निरुपमा प्रधान- सोनाळकर यांनी विवाहानंतर पाउल ठेवले. सुरवातीला खाणाखुणा, हावभाव, नंतर मोडक्यातोडक्या जर्मन भाषेतून व शेवटी अस्खलित जर्मन भाषेच्या आधारे हा देश आपलासा केला. भारतात बॅडमिंटनपटू म्हणून ओळखल्या जात असल्याने त्यांनी या आवडत्या खेळाचे प्रशिक्षण तेथे देण्यास सुरवात केली. ट्रॅव्हल-टूर्सच्या माध्यमातून जर्मन नागरिकांना भारत, नेपाळ, रशिया, इंग्लंडच्या सफरी घडविल्या. ३५ वर्षांच्या काळातील अनुभव, भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, माणुसकी असलेला, माणुसकी हरविलेला जर्मनी त्यांनी 'आठवणींच्या जगात'मधून उभा केला आहे. त्यातून या देशाविषयीचे कुतूहल शामते व माहितीही होते.