Author : SANDEEP DANDEKAR
ISBN No : 9788192237947
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : RAFTER PUBLICATIONS
आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट विज्ञानावर आधारित असल्याशिवाय तिचा खरेपणा सिद्ध होत नाही. तरीही जगात अशा काही घटना घडत असतात की, त्या विज्ञानाच्याही पलीकडे असतात. अशा अद्भुत, रहस्यमय, अघटीत गोष्टींचे अनेकांना कुतूहल असते. संदीप दांडेकर यांनाही ते आहेत. त्याच कुतूहलातून त्यांनी लिहिलेल्या कथा 'अतर्क्य 'मध्ये वाचावयास मिळतात. माणूस मरण पावल्यानंतर पुढे काय घडते हे गोविंदरावांच्या मृत्यूनंतरचे नाट्य 'बॅकस्टेज'मधून रंगविले आहे. एकुलता एक असलेल्या संतोषचे लाड त्याचे गरीब आईवडील करतात . त्याला शिक्षण देतात. पण नोकरी न मिळाल्याने वाममार्गाला लागलेला संतोष बॉसचा आरोप आपल्यावर घेऊन भरभक्कम पैसा वसूल करतो आणि आईवडीलांच्या ऋणातून मुक्त होतो. कोकणातील शिरखण या गावातील वाड्यात रात्री घडणारा प्रसंग, जगात आपणच सर्वांपेक्षा दु:खी असून त्यावर उपाय शोधणाऱ्या एक्झिक्युटिव्हला इतरांची दु:ख समजल्यावर आपले आयुष्य किती बरे आहे हे समजते. चंदू नावाच्या हरहुन्नरी हेराने आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला हुशारीने घेतला...या व अशा अनेक रोमांचकारी कथा यात वाचताना मिळतात. अतिथरारकता टाळून लिहिलेल्या आकलन शक्तीपलीकडील या कथा वाचकांना खिळवून ठेवतात.