MARATHI VANGMAYACHA GALIV ITIHAS

Author : P L DESHAPANDE

ISBN No : 9788174867926

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : MAUZ PRAKASHAN


सदर लेखात पु. ल.नी प्राचीन मराठी वाङ्‍मयाच्या इतिहासाचे आपल्या अजोड विडंबनशैलीत कथन केले आहे.

पुलंनी पुस्तकावर केलेली विडंबनात्मक प्रस्तावना:

साहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली. आमचे उथळ लिखाण आम्ही उथळ आहे हे सांगून दिले होते. त्याशिवाय लोक खळखळून हसत नाहीत हा अनुभव होता. उथळ पाण्याप्रमाणे उथळ लिहिण्यालाही खळ्खळाट फार. इतक्या इमानाने सांगूनही अंखड ज्ञानेश्वरी एखाद्या कसरीसारखी खाऊन काढणारे विद्वान, लिटर लिटर शांतरस बसल्या बैठकीला रिचवणारे महापंडित(१), आम्ही विद्वत्तेचा धंदा न करता हसवण्याचा धंदा करतो म्हणून विषय सोडून आमच्या विरुध्द बरळू लागले. नशीब, विषयच सोडला. कारण त्यांचा संताप अनावर झाल्याचे कळले होते. हे सारे ऐकून आम्ही अंतर्मुख झालो. एकाएकी ‘मी’पणा जाऊन ‘आम्ही; पणा(२) आला. "खोली वाढवली पाहिजे", "खोली वाढवली पाहिजे" म्हणू लागलो. आमचे एक मित्र म्हणाले, त्यापेक्षा ओनरशिपचा ब्लॉक घ्या." त्यांचा वाङ्‍मयाशी संबंध नाही. नुसतेच वाचक आहेत. त्यांना वाङ्‍मयीन खोली कशी असते ठाऊक नाही. शेवटी ‘वाङ्‍मयाचा इतिहास’ लिहिण्याखेरीज गत्यंतर नाही हे उमगले.
 

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories