GANGOT

Author : P L DESHAPANDE

ISBN No : 9789350910740

Language : Marathi

Categories : MARATHI BOOK

Sub Categories : FICTION

Publisher : MAUZ PRAKASHAN


यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महौदधौ।
समेत्य च व्यपेयतं तद्‌वद्‌भूतसमागम:॥

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्ड्‌स्‌वर्थच्या ‘यारो रीव्हिजिटेड्‌’ यासारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या वेव्ह्‌लेंग्थ्‌स पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणार्‍या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे ‘गणगोत’ फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ‘इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!’

पुढल्या शे-दोनशे पानांतून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी! ह्या पुस्तकातली सुरेख चित्रे काढणारे आणि पुस्तकाला सुंदर वेष्टण देणारे माझे चित्रकार मित्र श्री. ओक यांचा मी अत्यंत आभारी आहे. २३ एप्रिल १९६६ ह्या दिवशी हे पुस्तक प्रसिद्ध व्हावे अशी माझी इच्छा होती. ज्योतिषाने काढलेला मुहूर्त म्हणून नव्हे तर आम्हा उभयतांवर वडीलधार्‍या माणसासारखी माया करणारे डॉ. भाई व सौ. इंदूताई दिवाडकर यांच्या लग्नाचा आज पंचविसावा वाढदिवस आहे, तो मुहूर्त गाठायचा होता म्हणून. ही इच्छा पुरी केल्याबद्दल मी प्रकाशक रा. ज. देशमुख आणि कल्पना मुद्रणालयाचे लाटकर बंधू, भालोबा खांडेकर आणि सहकारी मुद्रक वर्गाचा ऋणी आहे. ह्या पुस्तकात घालण्यासाठी जी रेखाचित्रे काढली आहेत त्यांचे मूळ फोटो ज्यांनी ज्यांनी दिले, त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषत: रावसाहेबांचा फोटो दुर्मिळ होता; तो श्रीमती काशीबाईंनी दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.

~ पु. ल. देशपांडे

  • No Comments.
Name(Required)
Mobile No(Required)
Email (Required)
Comments

New Copies are not available for sale.
Old Copies are not available for sale.

Related Categories