Author : RATNAKAR MATKARI
ISBN No : 9789383466252
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : NAVACHAITANYA PRAKASHAN
जग कितीही विज्ञानवादी झाले तरी दृश्य जगापेक्षा एक वेगळे जग असल्याचा समाज असून, त्याबद्धल बहुतेकांना आकर्षण असते. यातून गुढकथा निर्माण झाल्या आहेत. रत्नाकर मतकरी यांनीही साहित्यातील या वेगळ्या प्रकारात लेखन केले आहे. 'ऐक.. टोले पडताहेत!' यामध्ये त्यांच्या तब्बल ३० लघू गुढकथा वाचायला मिळतात. गावातील श्रीमंत व जुनं प्रस्थ असलेल्या कुटुंबातील पिरोजाबाई यांना ऐकू येणारे व मृत्यूची सूचना देणारे.
अस्तित्वात नसलेल्या घड्याळाचे टोले, चाळीत भाडेकरू असलेल्या 'तारकर' बद्धलचे संजीवनीला वाटणारे गुढ, मुलाच्या अपघाती मृत्यूने खचलेल्या वसुमतीला सत्य घटना सांगणारा तिचाच मुलगा वरूण, ऑफिसमध्ये जागा रिकामी होण्यापूर्वीच रुजू होणारे उमेदवार आणि नंतर त्या जागेवरील आधीच्या लोकांचा झालेला मृत्यू.. अगदी सहज, साध्या वाटणाऱ्या या कथांमधील गुंफलेले गुढ जसे उकलत जाते तसा अंगावर शहारा येतो. भीतीची सूक्ष्म लहर मनावर उमटते. पण या कथा वाचताना आपण त्यात गुंगून जातो..