Author : RANJIT DESAI
ISBN No : 9788177664840
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MEHTA PUBLISHING HOUSE
"प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं. हे आशयसूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा सूर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्यावर वेदनेने पिळवटलेला अस्सल कलावंत आहे. सती झालेली; पण जाता-जाता इतरांची आयुष्यं उजळणारी पुतळाबाई आहे, तर स्नेहाने मुत्सद्द्यांची हृदयं जिंकणारी, बुद्धिमान कलावंतीण माहेलका आहे.
या कथांमधून प्रेेमाचे वेगवेगळे पोत रणजित देसाई आपल्यापुढे ठेवतात. सगळ्या कथांचा बाज हा ऐतिहासिक असला, तरी त्यातल्या भावभावना मात्र कालातीत आहे.
’रोमँटिक’ जातकुळीच्या या कथा व्याकूळ करतात. यातली तपशिलांची, थेट वर्णनात्मक शैली मनाचा ठाव घेते.