Author : BABURAO ARNALKAR
ISBN No : B071KVKDWB
Language : Marathi
Categories : MARATHI BOOK
Sub Categories : FICTION
Publisher : MANORAMA PRAKASHAN
कदाचित् यातून आपणाला हवे असलेले प्रकरण निर्माण होऊ शकेल.’ झुंजार म्हणाला. आता भोलाला त्याचे ते बोलणे समजणे शक्य नव्हते आणि झुंजारही भोलाला काय वाटत असेल याकडे लक्ष देत नव्हता. ती मोलकरीण त्याचे ते संभाषण ऐकून त्यांच्याकडे घाबरलेल्या मुद्रेने पाहात होती. पण झुंजार तिच्याकडेही लक्ष देत नव्हता. तो लक्षपूर्वक ते कर्कश संगीत ऐकत होता. घरात आल्यानंतर त्याला तो आवाज तिप्पट मोठ्याने ऐकू येत होता. त्या आवाजात मिसळलेला किंकाळीचा आवाज त्याने दोन वेळा ऐकला होता. झुंजारने भोलाचा हात जोराने दाबला आणि तो म्हणाला, ‘तू एक मिनिटभर हलू नकोस.’ झुंजार त्या खुर्चीला बांधलेल्या मोलकरणीजवळून पलीकडच्या टोकाला असलेल्या दाराजवळ गेला. ते दार उघडताच त्याला त्या भयानक संगीताचा अधिकच जोराचा आवाज ऐकावयास मिळाला. त्याला समोरच वरच्या मजल्याकडे जाण्याचा जिना दिसत होता आणि दुसर्या. बाजूला ओळीने तीन दारे दिसत होती. त्या जिन्याच्या पलीकडे पुढल्या दारासमोरची खोली होती. झुंजार ज्या दाराआडून तो आवाज होत होता तेथे गेला. तो त्या दाराजवळ पोहोचला नाही तोच ते संगीत अचानक थांबले. जणू काय तलवारीनेच ते छाटले गेले होते आणि त्या सार्याु घरात भीषण शांतता पसरली होती. झुंजार त्या दारापासून अवघ्या दोन फुटांवर होता. ती क्षीरसागराची बैठकीची खोली असावी असा त्याचा तर्क होता. त्याने आणखी एक पाऊल टाकून अर्धे अंतर कमी केले आणि त्याला त्या दाराच्या पलीकडच्या बाजूला होणारा अत्यंत निर्दय पण खडबडीत आवाज स्पष्ट ऐकता आला. ‘ठीक आहे, हा नुसता नमुना झाला. आता तरी तू त्या पैशांचे काय केलेस ते आम्हाला सांगणार आहेस की पुन्हा आम्ही आणखी रेकार्ड लावावी?’...